“२६/११ कसाब आणि मी” पुस्तक
मात्र ही माहिती नवी नाही. कसाब व त्यांच्या साथीदारांच्या हिंदू नावांच्या बनावट ओळखपत्रांची माहिती २६/११ हल्ल्याच्या खटल्यात न्यायालयातही सादर करण्यात आली होती. तसेच २६/११ दहशतवादी हल्ल्याचे मुख्य तपास अधिकारी रमेश महाले (सध्या निवृत्त) यांनी आपल्या “२६/११ कसाब आणि मी” या पुस्तकात याबद्दल अगदी सविस्तर माहिती दिली आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती २५ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रकाशित झाली. महालेंच्या पुस्तकातील माहितीनुसार (पान क्र: ८४ व ८५) कसाबला जिवंत पकडल्यावर त्याने पोलिसांना जबाब देताना सांगितले कि, “मुंबईत जर दुर्दैवाने कुणी पोलिसांच्या हाती सापडलंच, तर त्यांची खरी ओळख पटू नये आणि हल्ल्याचा कट नक्की कुठे शिजला, याचा थांग भारतीय यंत्रणांना लागू नये, यासाठी आम्हा दहाही जणांना नवी ओळख देणं गरजेचं होतं. त्यामुळे काही दिवस अगोदर आमची छायाचित्रं घेण्यात आली. मी आणि माझ्या इतर साथीदारांची ओळख पटू नये म्हणून हिंदू नावांचे ओळखपत्र देण्यात आले होते. अरुणोदय डिग्री अँड पी. जी. महाविद्यालय, वेंद्रे कॉम्प्लेक्स, दिलखुशनगर, हैद्राबाद, पिनकोड – ५०० ०६० असा पत्ता छापलेली ओळखपत्रे बनवून त्यावर ही छायाचित...